budget 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Book Launch Event : ‘अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी' पुस्तकाचे प्रकाशन, नागरिकांना मोफत मिळणार पुस्तके

Aryans Group of Companies : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी’ने सामान्य लोकांना अर्थसंकल्प कळावा यासाठी, ‘अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता. २३) केले होते.

Team Agrowon

Pune News : ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी’ने सामान्य लोकांना अर्थसंकल्प कळावा यासाठी, ‘अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता. २३) केले होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

या पुस्तकाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रस्तावना लाभली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर उपस्थित होते.

नुकताच राष्ट्रीय आणि राज्य अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जे विश्लेषण केले जाते, ते सर्वसामान्यांना फारसे कळतेच असे नाही. केवळ, काय स्वस्त, काय महाग ही माहिती सर्वसामान्यांना समजते.

मात्र, हा संपूर्ण अर्थसंकल्प सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. जगजीवन काळेलिखित या पुस्तकामुळे आता सर्वसामान्य लोकांपर्यंत अर्थसंकल्प सोप्या भाषेत पोहोचेल.

अर्थसंकल्पाचा प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, त्याच्या बचतीवर काय परिणाम होणार, किती आर्थिक भार वाढणार, आणि जाहीर झालेल्या योजना कितपत योग्य आहेत किंवा त्या तळागाळापर्यंत पोहोचतील का, याची चर्चा कुठे होताना दिसत नाही.

दरम्यान हाच उद्देश ठेवून पुस्तकाचे निर्माते, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुस्तकाचे प्रकाशक मनोहर जगताप यांनी अर्थसंकल्पाचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यासाठी हे पुस्तक तयार केले आहे.

अर्थसंकल्पाचे सोप्या भाषेत विश्लेषण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी हे पुस्तक विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT