Dada Bhuse Agrowon
ॲग्रो विशेष

Dada Bhuse : कृषिमंत्र्याची तंबी तर दुसरीकडे मंत्री दादा भूसेंकडून पाठराखण?; पीक विमा प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता

Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्याचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. यादरम्यान सीएससी केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्यावर्षी प्रमाणाचे खरीप हंगाम २०२४ साठी राज्य सराकारने यंदा देखील एक रुपयात पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवली. या योजनेचा शिंदे सरकारने मोठा गाजावाजा देखील केला. मात्र सीएससी केंद्र धारकांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांची मागणी करत लूट चालवली. याचा भांडाफोड ॲग्रोवन' आणि साम टीव्हीने केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले. मात्र आता त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री दादा भूसे यांच्याकडून सीएससी केंद्र धारकांची पाठराखण केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कारभारला दादा भूसे यांची फूस आहे का? असा सवाल शेतकऱ्यांसह विरोधक विचारत आहेत. तर याबाबत भूसे यांचा कृषी विभागाच्या एका बैठकीत बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यंदा मॉन्सून सुरू झाला असून राज्यातला शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून देखील खरीपाची तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान सरकारने गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा देखील  शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. मात्र एक रूपयाच्या पीकविमा योजनेची नोंदणी करण्यासाठी सीएससी केंद्र धारक अर्ज भरण्यासाठी ५० ते १०० रुपयांची मागणी करत आहेत. याबाबत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील सीएससी केंद्रावर स्टिंग ऑपरेशन 'ॲग्रोवन'चे प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी केले. त्यानंतर राज्यात शेतकरी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सरकार आणि कृषीमंत्र्यानी याबाबत कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. 

यादरम्यान एक रुपयात पीकविमा योजनेवर विरोधक आक्रमक झाले आहेत. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भूसे यांनी कृषी विभागाच्या एका बैठकीत सीएससी केंद्र चालकांच्या कृतीचे समर्थन करणारे वक्तव्य केलं आहे. भूसे यांनी, पीकविमा जरी एक रुपयात असला तरी त्यासाठी शेतकऱ्यांना १०० रुपये मोजावे लागत आहेत. साम टीव्हीने याबाबत स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला होता. पण सीएससी केंद्र चालकांनी भरलेल्या अर्जामुळे शेतकऱ्यांचे तीन ते चार हजार रुपये वाचत होते, असा दावा मंत्री भूसे यांनी केला. 

तर साम टीव्हीने त्यांच्या स्टिंग ऑपरेशन शेतकऱ्याकडून १०० रुपये घेतल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांचे तीन ते चार हजार रुपये वाचवल्याचे सांगितले नाही असेही भूसे म्हणाले. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला असून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT