Water Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : मुळशीच्या पाण्याबाबत नऊ फेब्रुवारीला जन सुनावणी

Water Scheme : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक एक आणि दोनसाठी वाढीव पाणी मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Team Agrowon

Pune News : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक एक आणि दोनसाठी वाढीव पाणी मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी नऊ फेब्रुवारीला होणार असून सेनापती बापट जलाशयातून वाढीव पाणी मिळणार का याकडे सर्व मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.

मुळशी प्रादेशिकच्या पहिल्या टप्प्यात २८ गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणी पोचले. तथापि कोळवण खोऱ्यातील आणि माण-हिंजवडी परिसरातील गावांनाही मुळशी धरणातून पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मुळशी प्रादेशिकच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार केला.

या प्रस्तावाद्वारे २०३९ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून टप्पा एकसाठी ७.३६ आणि टप्पा दोनसाठी १५.३६ दशलक्षघनमीटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावास शासनाकडून तांत्रिक मान्यता तसेच प्रशासकीय मान्यता मिळाली.

या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण केली असून ठेकेदारास काम करण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदाराने प्रत्यक्ष जागेवर काम चालू केल्यानंतर टाटा कंपनीने या कामास आक्षेप घेतला. कंपनीकडून उच्च न्यायालयात याचिक दाखल केली. न्यायालयाने टाटाच्या

संभवे बोगद्यातून पाणी उपसणे शक्य

मुळशी टप्पा एकसाठी वाढीव मागणी आणि टप्पा दोनमधील कोळवण खोऱ्यातील गावे अशी एकूण पाणी मागणी ‘मुळशी मध्यम बोगदा’ प्रकल्पातील शिल्लक पाण्यातून पूर्ण करता येणे शक्य आहे.

हे पाणी संभवे येथील बोगद्याद्वारे मुळा नदीत सोडण्यात येते. मुळा नदीत जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले असून या बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करणे शक्य आहे, असे कंपनीने कळविले आहे. जलसंपदा विभागानेदेखील या प्रकल्पातून दहा दलघमी पाणी शिल्लक असल्याचे कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT