Agriculture Science Center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Science Center : पर्यावरणपुरक जीवन पद्धतीबाबत कृषी विज्ञान केंद्राद्वारे जनजागृती

Indian Agriculture : भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशात २० मे ते ५ जून या कालावधीत ‘‘पर्यावरणपुरक जीवन पद्धती अभियान (मिशन लाइफ)’’ राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Jalna News : भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशात २० मे ते ५ जून या कालावधीत ‘‘पर्यावरणपुरक जीवन पद्धती अभियान (मिशन लाइफ)’’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शनिवारी (ता. २७) घनसावंगी तालुक्यातील शेवगळ, पानेवाडी आणि शिंदे वडगाव या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.

या विशेष भेटीत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, राहुल चौधरी, सुनील कळम तसेच पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे यांचा समावेश होता.

तालुक्यातील शेवगळ येथे सरपंच सतीश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ सोनुने यांनी शेतकऱ्यांना शेती करतांना पर्यावरण पूरक जीवनपद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी पऱ्हाट्या जाळू नयेत तर यंत्राच्या साहाय्याने त्यांना जमिनीत गाडून त्यांचे सेंद्रिय खत तयार करावे, असे सांगितले.

त्या नंतर शास्त्रज्ञांच्या चमूने संजय लोंढे यांचा शेळीपालन प्रकल्प, संदीप लोंढे यांचा रेशीम प्रकल्प, चॉकी सेंटर, मोसंबी आणि चारा पीक प्रात्यक्षिकांना भेटी देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT