Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Refund : आंबा, काजू पीकविमा परतावा २८ ऑगस्टपूर्वी द्या

Agitation Warning : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना २८ ऑगस्टपूर्वी विमा परतावा देण्यात यावा अन्यथा २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना २८ ऑगस्टपूर्वी विमा परतावा देण्यात यावा अन्यथा २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेने कृषी विभागाला दिला आहे.

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. कोकणातील आंबा आणि काजू या दोन पिकांचा या योजनेत समावेश आहे. या वर्षी जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. यामधील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली असून ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र काजू पिकाखालील आहे.

शेतकऱ्यांनी हे क्षेत्र संरक्षित करण्यासाठी १२ कोटी ८५ लाख रुपये स्वहिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे. या वर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानवाढ यांसारख्या कारणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाले असून अनेक मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याचा अंदाज आहे.

आंबा पिकासाठी संरक्षित कालावधी हा १५ मे तर काजू पिकांसाठी ३१ मार्च असा कालावधी होता. त्यानंतर जे शेतकरी विमा परताव्यास पात्र आहेत त्यांना विमा परतावा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु हा कालावधी संपून दोन महिन्यांचा कालावधी संपला आहे. परंतु विमा परतावा शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झालेल्या नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून विमा परतावा गणेशोत्सवापूर्वी मिळावा याकरिता शेतकऱ्यांकडून मागणी सुरू होती. परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही आजमितीस झालेली नाही. दरम्यान, आता ठाकरेच्या शिवसेनेने हा विषय उचलून धरला आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना जुलैमध्येच विमा परतावा मिळणे आवश्यक होते. परंतु राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा विमा कंपनीला मिळाला नसल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने परतावा द्यावा अन्यथा आम्ही आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडणार आहोत.
सतीश सावंत, शिवसेना (ठाकरे गट) नेते, कणकवली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT