Dairy Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : माढ्यात दूधदरासाठी ‘रास्ता रोको’

Dairy Farmer Issue : माढ्यात दूध उत्पादकांनी एकत्रित येऊन दूध दरवाढीच्या मागणीसाठी गाईला दुधाने अंघोळ घालून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

Team Agrowon

Solapur News : माढ्यात दूध उत्पादकांनी एकत्रित येऊन दूध दरवाढीच्या मागणीसाठी गाईला दुधाने अंघोळ घालून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तसेच तुरीचा विमा अग्रिममध्ये समावेश करावा, अशी मागणी करत बुधवारी (ता. २९) रास्ता रोको आंदोलन केले.

शहरातील इंदिरा गांधी चौकात सामाजिक कार्यकर्ते शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. शासनाने दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये हमी भाव देण्याचा निर्णय घोषित केला आहे. मात्र तो अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

एकीकडे पशुखाद्यासह खुराकाचे वाढलेले दर आणि दुसरीकडे दुधाला चारा, मका, भरडा आणि पेंड भाव वाढ शंभर टक्के झालेली आहे आणि दूध दर प्रत्येक १० दिवसांत एक रुपयाने कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर जनावरे कशी जगवायची हा प्रश्न आहे.

याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या वेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यांना दिले.

माढा तालुका दुष्काळी आहे. खरीप हंगामात सर्वाधिक तूर उत्पादन घेतले जाते. तुरीचा व इतर पिकांचा पीक विम्यात समावेश करावा. तुरीचा विमा अग्रिममध्ये समावेश करून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा मिळावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT