Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला ! जायकवाडीच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी रोखला जालना रस्ता

Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला.

Swapnil Shinde

Chhatrapati Sambhajinagar News : गोदावरी खोऱ्यातील जलाशयामधील पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्यात यावे, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय नेत्यांनी रास्तारोको केला. आंदोलकांनी तब्बल २ तास जालना रस्त्यावर ठिय्या मांडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यंदा मराठवाड्यात माॅन्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला. मराठवाड्यातील चार जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत धरणात फक्त ४५ टक्के पाणी साठा आहे.

परंतु जायकवाडी धरण असलेल्या गोदावरी खोऱ्यातील अनेक जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे उर्ध्वभागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून अतिरिक्त असलेले पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची मागणी होत आहे.

तशाप्रकारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी दि.30 ऑक्टोबर 2023 रोजीच आदेश काढले आहेत.मात्र, त्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे.

त्यानंतर पाटबंधारे विकास महामंडळाकडून उर्ध्व भागातील जलाशयातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत

पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री राजेश टोपे, संजय शिरसारट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार जायकवाडी धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलाशयातून अतिरिक्त असलेले पाणी जायकवाडी धरणात सोडावे, असे निवेदन देण्यात आले होते.

गोदावरी खोऱ्यातील नाशिक व नगर जिल्ह्यातून ८.६० टीएमसी पाणी जायकवाडीत साेडण्यास शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी त्यास विराेध दर्शविला. याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे जालना रस्त्यावर दोन तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT