Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance Protest : ‘पीकविम्या’साठी वीज टॉवरवर चढून आंदोलन

Crop Insurance Compensation : मागील वर्षी शासनाने अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर व काही भाग दुष्काळी जाहीर केले होते. या भागातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करणे विमा कंपनीची जबाबदारी असताना अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

Team Agrowon

Amaravati News : पीकविमा कंपनीच्या कार्यालयात अनेक वेळा विचारणा केल्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करित राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यानी गुरुवारी (ता. ११) थिलोरीनजीक असलेल्या हायपॉवर विद्युत टॉवरवर चढून आंदोलन केले.

मागील वर्षी शासनाने अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर व काही भाग दुष्काळी जाहीर केले होते. या भागातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करणे विमा कंपनीची जबाबदारी असताना अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, आंदोलन सुरू झाल्याची माहिती प्रशासनाला असतानाही कोणतेही अधिकारी वा विमा कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले नाहीत.

माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी मात्र तातडीने बंदोबस्त लावला. २०२३-२४ करिता पीकविमा मंजूर झाला असून याबाबत कारवाई करावी, असे आदेश शासनाकडून असताना विमाकंपनी मात्र नेहमीप्रमाणे विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास विलंब करीत असल्याचा आरोप या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच आंदोलनकर्ते किरण होले यांनी केला.

अकोला, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांत वितरण झाले असून जाणूनबुजून अमरावती जिल्हा मागे ठेवण्यात आला आहे. आंदोलनस्थळी परिसरातील शेकडो शेतकरी जमले होते. हायपॉवर इलेक्ट्रिक टॉवर असल्याने यावरून खाली उतरावे, असा आग्रह पोलिसांच्या वतीने करण्यात आला.

मात्र, शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन विमा कंपनीच्या अधिकऱ्यांनी दिल्याशिवाय टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचे आंदोलनकर्ते किरण होले यांनी सांगितल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. विमा कंपनी आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी फोन वरून आंदोलनकर्ते यांच्याशी संपर्क करून आंदोलन मागे घ्यावे, असा आग्रह केला.

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना उत्पन्नात घट आल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. पीकविमा मंजूर झाला असतानाही येथील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र विमा कंपनी करीत आहे. आम्ही यानंतर उग्र आंदोलन करू.
-किरण होले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष.
हा विषयी आम्ही वरिष्ठ स्तरावर कळविला आहे. मागील काळात याबाबत अहवाल दिला आहे. मुंबई येथून आदेश आल्यानंतर कारवाई सुरू होईल. वरिष्ठांना माहिती दिली आहे.
-गौरव कुलट, प्रतिनिधी, विमा कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT