Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Issue : ‘उजनी’च्या पाण्यासाठी कुर्डू येथे ‘रास्ता रोको’

Protest for Ujani Water : माढा येथील बेंद ओढ्यामध्ये उजनीचे पाणी सोडण्यासाठी संघर्ष आता टोकाला गेला आहे. याच मागणीसाठी पुणे-लातूर महामार्गावरील कुर्डू येथे गुरुवारी (ता.२३) सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : माढा येथील बेंद ओढ्यामध्ये उजनीचे पाणी सोडण्यासाठी संघर्ष आता टोकाला गेला आहे. याच मागणीसाठी पुणे-लातूर महामार्गावरील कुर्डू येथे गुरुवारी (ता.२३) सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बेंद ओढ्याचे खोली करण माढा वेल्फेअरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावर अवलंबून असणाऱ्या गावांपैकी १३ गावांच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला ‘रास्ता रोको’ची निवेदने दिली. त्यानुसार हे आंदोलन झाले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, त्याचप्रमाणे आम्हीही या पाण्यासाठी आंदोलनात उतरू, असा संकल्प या ओढ्याच्या लगत असणाऱ्या सर्व गावांतील लोकांनी केला. त्यासाठी सर्वांना आवाहनही करण्यात आले. भविष्यात या मागणीसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही या १३ गावांतील लोक घेतील, असेही सांगण्यात आले.

पाणी संघर्ष समिती कुर्डूचे अण्णासाहेब ढाणे, संदीप पाटील, भारत कापरे, नामदेव हांडे, माढा नगराध्यक्ष मीनल साठे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य नीता ढाणे, कल्पना जगदाळे, गीता देशमुख, शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष आशा टोणपे, कुर्डूचे सरपंच बाबाराजे जगताप, रामभाऊ भानवसे, भय्या माळी, बापूसाहेब जगताप, ज्ञानदेव चोपडे, नितीन माळी आदी उपस्थित होते. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT