Milk Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : अंबड येथे दूधदरासाठी समितीच्या आदेशाची होळी

Milk Rate Protest : दुधाला किमान ३५ रुपये प्रतिलिटर हमी दर मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२४) किसान सभेकडून अकोले तालुक्यातील अंबड येथे दूध दर समितीच्या आदेशाची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला.

Team Agrowon

Nagar News : दुधाला किमान ३५ रुपये प्रतिलिटर हमी दर मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२४) किसान सभेकडून अकोले तालुक्यातील अंबड येथे दूध दर समितीच्या आदेशाची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला.

शासनाने दुधाच्या दराबाबत ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. ‘‘राज्यातील सुमारे २१ जिल्ह्यांतील विविध ठिकाणी या आदेशाची होळी करण्यात आली, असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दूधदरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यावर शासनाने दुधाच्या दरासंदर्भात अभ्यास करून दर निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली. समितीने गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे निर्देश दिले. मात्र नेहमीप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ, बटर व पावडरचे दर कमी झाल्याचे सांगत दराची पडझड सुरू राहिली.

गेल्या दोन-अडीच महिन्यात सुमारे १० रुपयांनी दर खाली आले आहेत.
दरम्यान, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. मात्र त्यात दरासंदर्भात काहीही निर्णय न झाल्याने किसान सभेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अंबड येथे डॉ.नवले यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेकडून दूध दर समितीच्या आदेशाची होळी करण्यात आली.

सुरेश भोर, डॉ. सदीप कडलग, माधव भोर, आर. डी. भोर, सरपंच रेश्मा कानवडे, भास्कर कानवडे, दत्ता धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ, वसंत मनकर, किरण गजे, शांताराम गजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. २१ जिल्ह्यांत या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.

‘राज्यस्तरीय आंदोलनाची दिशा लवकरच’
डॉ. अजित नवले म्हणाले, दुधाला दर मिळत नसल्याने शासनाने दुधाचे दर निश्चित करण्यात आलेल्या समितीच्या आदेशाची होळी करत सरकारचा निषेध केला आहे. राज्यात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी आंदोलनात सहभागी झालेल्या वेगवेगळ्या नेत्यांची बैठक घेऊन राज्यभर तीव्र आंदोलन करण्यासाठी दिशा लवकरच ठरवणार आहोत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT