Shaktipeeth Mahamarg agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत ८ एप्रिलपासून धरणे आंदोलन

Sangli Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या आठ एप्रिलला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Protest Sangli : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या आठ एप्रिलला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता वाढवली जाईल, अशी माहिती किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातून आतापर्यंत २१०० हरकती प्रांत कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

सक्तीने भूसंपादनाविरोधात आज सांगलीवाडी, सांगली, पद्माळे, कर्नाळ, कवलापूर येथील दोनशेंवर शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या. त्याआधी कवलापूरच्या दोनशेंवर शेतकऱ्यांनी सामूहिकपणे हरकती दाखल केल्या होत्या. जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी नागरिक जागृती मंच, शेतकरी कामगार पक्ष, नागरिक जागृती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आज तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ येथील पाच हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ मार्चला अधिसूचना काढली आहे. त्यात बाधित शेतकऱ्यांच्या हरकती व आक्षेप २१ दिवसात द्यावेत, असे म्हटले आहे. त्यानुसार अनेक शेतकरी वैयक्तिकही हरकती नोंदवत आहेत.

जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनींमधून महामार्ग गेल्याने आम्ही संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहोत. आधीच एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे भूमिहीन होणार आहेत. शासनाने ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मोबदल्याबाबतच्या परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

'गुणांक एक नुसार मोबदला देणार आहोत; तोही रेडीरेकनरनुसार. त्यामुळे एक एकर जमिनीचा दिला जाणारा मोबदला अतिशय तोकडा असेल. त्या भरपाई मोबदल्यात एक गुंठा जमीनही मिळणार नाही. या अन्यायाविरोधात आमचा लढा असेल. भूसंपादन अधिनियम १९५५ नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT