Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death : सोळा आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रस्ताव प्रलंबित

Farmers Issue : नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.

Team Agrowon

Amaravati News : नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, डोक्यावर बँकेचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तिवसा तालुक्यात जानेवारी ते जून, या सहा महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरडवाहू शेतपट्टे असल्यामुळे निसर्गाच्या भरवशावरच शेती करून त्यामध्ये सोयाबीन, तूर, पराटी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. परंतु गेल्या सहा वर्षांपासूनच्या उत्पन्नाची आकडेवारी बघता शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याचे पाहायला मिळते. त्यात महागाचे खत, बियाणे, फवारणी यासाठी अधिक खर्च करूनही हातात काहीच उरत नाही.

मग शेतीसाठी घेतलेल कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होतो. अखेर नाइलाजास्तव शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो. तिवसा तहसीलअंतर्गत जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

या सोळा शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या माहितीसह आत्महत्येचे प्रस्ताव तिवसा महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले, परंतु अजूनपर्यंत सोळा आत्महत्याग्रस्त कुटुंब शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची आहे. पुढील उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण करायचे तरी कसे? अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लागली आहे

विविध अहवालांची प्रतीक्षा

जिल्ह्यातील १४ तालुक्यांत एकूण १७० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. ज्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडे २३ प्रकरणे अपात्र असून तालुकास्तरीय चौकशीमध्ये ९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. तिवसा तालुक्यात १६ आत्महत्या आहेत. यामध्ये तालुका कृषी अधिकारी, पोलीस ठाणे, शवविच्छेदन अहवाल प्राप्त नसल्याने प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT