Pandharpur Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Pandharpur Yatra : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

Team Agrowon

Pandharpur News : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. १२ नोव्हेंबररोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी २ ते १५ नोव्हेंबर आहे.

या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके, मुख्यधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तत्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. आवश्यक ठिकाणी बॅरकेडिंग करावे अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपूल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देऊ नये.

जुना दगडी पुलाला बॅरेकेडिंग करावे. बोटीत भाविकांसाठी लाइफ जॅकेटची व्यवस्था करावी. मंदिर समितीने दर्शनरांगेत, दर्शन मंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यावे, असे ते म्हणाले.

जनावर बाजारावर ठेवा लक्ष

कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने संबंधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. विशेष करून बाजारातील सोई- सुविधांवर लक्ष ठेवा, तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar On Ajit Pawar: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'; रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले?

Cotton Market Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळीचे बाजारभाव

Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT