Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Management : योग्य व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ होते

योग्य व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाची जोमदार वाढ होते व उत्पादकता वाढते व पुढे टिकूनही राहू शकते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले.

Team Agrowon

Jalgaon News : योग्य व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाची जोमदार वाढ होते व उत्पादकता वाढते व पुढे टिकूनही राहू शकते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्रातील (Agriculture Science Center) विशेषज्ञ डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले.

केळी पिकाबाबत ‘ॲग्रोवन’तर्फे वाडे (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा.लि. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. या वेळी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ डॉ.दिनेश नांद्रे, रोहित कडू यांनी मार्गदर्शन केले.

वाडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आवारात हा कार्यक्रम झाला. माजी सरपंच भरत मोरे, सोसायटीचे अध्यक्ष देविदास माळी, यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा.लि.चे क्षेत्रीय व्यवस्थापक सागर कळमकर, प्रतिनिधी सुमीत पटेल आदी उपस्थित होते.

डॉ. नांद्रे म्हणाले, की केळी पिकाच्या व्यवस्थापनात लागवडीपासून किंवा सुरुवातीपासून योग्य पाणी व्यवस्थापन करायचे असते. अनेकदा अतिपाणी दिले जाते. ठिबकमधून सिंचन रोज सुरूच असते. शेतकरी अधिकाधिक शेत भिजविण्यावर भर देतात. परंतु केळीला योग्य पाणी द्यावे लागते.

योग्य सिंचन व्यवस्थापन केले जात नसल्याने पिकात वाफसा नसतो. कायम आर्द्रता असते. त्यात करपा रोग फोफावतो. यामुळे शेतकऱ्यांनी हवे तेवढेच पाणी द्यायला हवे.

तसेच खते देतानादेखील कुणी सांगते, म्हणून खते न देता आपल्या जमिनीला कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन कार्यवाही करायला हवी. योग्य व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाची जोमदार वाढ होते व उत्पादकता वाढते व पुढे टिकूनही राहू शकते.

श्री. कडू म्हणाले, की खते देताना जिवाणू खतांचाही उपयोग करायला हवा. सुपर फॉस्फेट नेहमी सुरुवातीच्या काळात दिले पाहिजे. योग्य खत व्यवस्थापनामुळे पिकाची गुणवत्ता तयार होते. तसेच अनावश्यक खर्चही टाळता येतो, असेही त्यांनी सांगितले.

खतांचा अपव्यय टाळला पाहिजे. अतिवापर कमी करावा. त्यामुळे जमिनीचे आरोग्यही राखले जाते, असेही त्यांनी आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT