Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा दिवाळीला देण्याचे आश्‍वासन फसवे

Crop Insurance Scheme : दिवाळीपूर्वीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे परतावे किंवा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्‍वासन सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : दिवाळीपूर्वीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे परतावे किंवा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्‍वासन सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिले. मात्र गुरुवारपर्यंत (ता. ९) केळी पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली नाही. अखेर हे आश्‍वासन केवळ पोकळ आश्‍वासनच राहते की काय, असा प्रश्‍न केळी उत्पादकांमधून उपस्थित होत आहे.

दिवाळी गोड होईल, केळी पीकविमाधारकांना दिलासा मिळेल, असे व्हिडिओ, पत्रके समाज माध्यमात लोकप्रतिनिधी व इतरांनी प्रसिद्ध केली. आपणच हा निधी आणला, अशा आविर्भावात लोकप्रतिनिधी होते.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा हवाला देत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील उत्पादकांना केळी पीकविम्याची भरपाई दिवाळीपूर्वीच मिळेल, असे आश्‍वासन दिले.

बुधवारी (ता. ८) व गुरुवारी बँकेचे कामकाज संपल्यानंतरही कुठल्याही केळी पीकविमाधारकाच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. याबाबत केळी उत्पादक बँकांमध्ये संपर्क करून आणि एकमेकांना भ्रमणध्वनीवर चर्चा करून विचारणा करताना दिसत होते.

विमा प्रतिनिधींकडून दिशाभूल

विमा कंपनीचे प्रतिनिधी याबाबत सतत दिशाभूल करीत आहेत. काही प्रतिनिधी केंद्राने निधीच दिलेला नाही. यामुळे परतावे किंवा नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी बतावणी करीत आहेत.

यावर काही शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयात विचारणा केली. त्यात परतावे सोमवारी (ता. १३) मिळतील, असे सांगण्यात आले. नेमकी खरी माहिती याबाबत कोण देत आहे, कुणावर विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT