Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : धुळे जिल्ह्यातील चारा, मुरघास अन्यत्र वाहतुकीस प्रतिबंध

Silage Transport : जिल्ह्यात १ एप्रिलपासून हिरवा व सुका असा मिळून सुमारे ३१ लाख ६९ हजार ४६६ टन चारा शिल्लक आहे.

Team Agrowon

Dhule News : जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघासाची कोणीही आगामी तीन महिन्यांपर्यंत इतर जिल्ह्यात वाहतूक करू नये, असा प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहे.

जिल्ह्यात १ एप्रिलपासून हिरवा व सुका असा मिळून सुमारे ३१ लाख ६९ हजार ४६६ टन चारा शिल्लक आहे. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या टिपणीची दखल घेत हा आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी गोयल यांनी आदेशात म्हटले आहे, की भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मॉन्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जनावरांसाठी चाऱ्याच्या टंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या पत्रानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या पेरणी अहवालानुसार १ एप्रिलपासून २६ लाख २८ हजार ६१२ टन हिरवा चारा, तर पाच लाख ४० हजार ८५४ टन वाळलेला चारा शिल्लक आहे. तो अंदाजे तीन ते चार महिने पुरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

El Nino Impact : एल निनोमुळे जलविद्युत निर्मिती घटणार; देशात कोळसा आयात वाढीची शक्यता

Modern Livestock Reproductive Technologies: पशुधनातील आधुनिक प्रजनन तंत्र

Goat Sheep Farming: शेळी-मेंढी- कोंबडीपालनाचा ‘राधाई इंटिग्रेडेट फार्म’

Dairy Farming Business: दुग्ध व्यवसायच दुष्काळात तारून नेईल

Women Farmers: राबते हात, न मिळणारी जमीन

SCROLL FOR NEXT