Livestock Census Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census : सांगली जिल्ह्यात पशुगणनेला वेग; ३४ टक्के काम पूर्ण

Census Progress : सांगली जिल्ह्यात २१ वी पशुगणना सुरू होऊन एक महिना झाला आहे. एका महिन्यात ३४ टक्के पशुगणना झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात २१ वी पशुगणना सुरू होऊन एक महिना झाला आहे. एका महिन्यात ३४ टक्के पशुगणना झाली आहे. ही पशुगणना ऑनलाइन सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी नेटवर्कचा अडथळा आहे, त्या ठिकाणी ऑफलाइनद्वारे गणना सुरू आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात विसाव्या पशुगणनेनुसार १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची संख्या आहे. दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. या वर्षी एकविसावी पशुगणना सुरू झाली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाची गणना करण्यासाठी ग्रामीण भागात १५५ प्रगणक शहरी भागात ४७ असे एकूण २०२ प्रगणक नेमले आहे. तसेच ग्रामीण भागात २४ पर्यवेक्षक, तर शहरी भागात १२ पर्यवेक्षक असे एकूण ३६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांच्या जनजागृतीही करण्यात आली आहे. मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल तयार केले आहे. या डिजिटल पद्धतीचा वापर करूनच जिल्ह्यातील पशुधनाची गणना सुरू केली आहे. गोवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, बदक, टर्की, हत्ती, ससे, डुक्करे, उंट, घोडा, गाढव, कुत्रा अशी पशुगणना होणार आहे.

जिल्ह्यातील पशुगणनेची गती वाढली आहे. प्रगणकांद्वारे ही गणना केली जात असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासह अन्य अडचणी सोडविण्यासाठी पर्यवेक्षक काम पाहत आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून २१ वी पशुगणना सुरू झाली आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन ही गणना केली जात आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीला ३४ टक्के पशूगणना झाली आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करायची आहे. त्यामुळे पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

नेटवर्कचा अडथळा

पशुसंवर्धन विभागाने ऑनलाइन पद्धतीने पशुगणना सुरू केली आहे. मात्र अनेक वेळा पशूंची नोंद करण्यासाठी नेटवर्कचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणना ऑफलाइनच्या माध्यमातूनही करण्यात येत आहे. त्यानंतर ऑफलाइन केलेली नोंद पुन्हा ऑनलाइनमध्ये नोंदवली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे. वास्तविक पाहता, नेटवर्कचा अडथळा येत असल्याने पशुगणना वेळेत पूर्ण होणार का असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात पशुगणना सुरळीत सुरू आहे. नेटवर्कचा अडथळा येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही ऑफलाइनद्वारे नोंदणी करून घेत आहोत. पशुपालकांनी अचूक माहिती प्रगणकांना द्यावी.
डॉ. अजयनाथ थोरे, उपायुक्त पशुसंवर्धन, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT