Mosambi Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Mosmbi Orchard Management : शास्त्रोक्‍त व्यवस्थापनातून संत्रा-मोसंबीची उत्पादकता वाढ

नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीच्या बागांवर विविध किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी बागांचे अस्तित्व धोक्‍यात येत आहे.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीच्या बागांवर (Mosambi Orchard) विविध किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी बागांचे अस्तित्व धोक्‍यात येत आहे. त्याची दखल घेत संत्रा-मोसंबी बागांचे वेळीच शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे यांनी केले.

नांदीखेडा (ता. कळमेश्‍वर) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी प्रमोद मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप दवणे, तालुका कृषी अधिकारी राकेश वसू, स्मार्ट कॉटन प्रकल्पाच्या अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, प्रगतिशील शेतकरी गुलाबराव मुळे, गणेश फाटे, उपसरपंच विठोबा रडके उपस्थित होते.

नागेश कामडी यांनी प्रास्ताविकातून शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश याविषयी माहिती दिली.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना संत्रा-मोसंबी पिकाचे व्यवस्थापन, मातीचे महत्त्व, पाण्याची शुद्धता, पिकांना आवश्‍यक असलेल्या जैविक घटकांची माहिती व महत्त्व, जैवविविधता, आर्थिक सक्षमता, विविध शेतमाल प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, पर्यावरणाचे संवर्धन यासह विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सूत्रसंचालन शीतल बुंडे, वैष्णवी मराठे व महेंद्र आलोटकर यांनी संयुक्‍तरीत्या केले. दिनेश वांढरे यांनी आभार मानले.

मेळाव्याला पियूष तेलरांधे, स्नेहा सातपुते, ईशांत राऊत, मंगेश सोनवणे यांच्यासह नांदीखेडा, पिल्कापार, तेलगाव, तेलकामठी, मोहपा, देवबर्डी, खुमारी, मांडवी, रामगिरी, लाडई, सवंद्री, सुसंद्री यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT