Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळीची व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी

Banana Procurement : यावल तालुक्यातील न्हावीसह परिसर केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरात मुख्य पीक म्हणून केळी घेतली जाते. त्यामुळे परिसरात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

Team Agrowon

Jalgaon News : यावल तालुक्यातील न्हावीसह परिसर केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरात मुख्य पीक म्हणून केळी घेतली जाते. त्यामुळे परिसरात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

मात्र, अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार (जाहीर दर) दर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आज रोजी फलक भाव १ हजार ९५० असून व्यापारी हजार ते ११०० रुपये क्विंटलला मागणी करीत आहेत.

फलक भाव ते खरेदी भाव यामध्ये तब्बल सातशे ते आठशे रुपये दरापर्यंत भावामध्ये तफावत आहे. अशा प्रकारे व्यापारी पिळवणूक करीत असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी केळी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट असूनही भावांत फार मोठी तफावत आहे. फलकावर असलेला भाव व प्रत्यक्ष विक्री यात मोठा फरक असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. केळीवर ‘सीएमव्ही’, ‘करपा’ रोगांचा प्रादुर्भाव, एकंदरीत उत्पादन खर्च वाढला असून, केळीला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी.
- शरद महाजन, अध्यक्ष, जे. टी. महाजन फ्रूट सेल सोसायटी, न्हावी (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT