Baliraja Miravnuk Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali Festival : ओतूर येथे बळीराजाची मिरवणूक

Baliraja Miravanuk : छत्रपती शिवरायांचा भालदार चोपदारांसह जिवंत देखावा साजरा करून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.

Team Agrowon

Pune News : येथे सत्यशोधक समाज व भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदेचे औचित्य साधून सम्राट बळीराजाच्या मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली. ‘‘इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे ’’ च्या गर्जनेने परिसर दणाणून गेला होता.

या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह महाराष्ट्रीयन संस्कृती जपत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. छत्रपती शिवरायांचा भालदार चोपदारांसह जिवंत देखावा साजरा करून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. तसेच महिलांची लेझीम पथके, टाळ पथक, वारकरी दिंडी पथक, शिवकालीन साहसी कौशल्याचे खेळ, बाराबलुतेदारीचे नंदीबैल, वासुदेव यांचा ही सहभाग होता.

पारंपारिक रित्या सजविलेल्या बैलगाडीत आसनस्थ सम्राट बळीराजा, महाराष्ट्रातील विविध संत, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले त्यांचे अनुयायी भाऊ कोंडाजी पाटील, महाधट पानसरे व इतर अशा अनेक प्रकारच्या बाबींचा या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता.

या मिरवणुकीत आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे, आशाताई बुचकेंसह ओतूर परिसरातील व संपूर्ण जुन्नर तालुक्यातून शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सम्राट बळीराजाची महती व माहिती बाबत दीपक कसाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रकाश भागवत यांचा ‘बळीराजा पुन्हा परत या’ यासंदर्भात मार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते रमेश डुंबरे यांच्या शुभहस्ते सपत्नीक करण्यात आले. भाऊ कोंडाजी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकरभाऊ डुंबरे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र डुंबरे, नंदू भोर, प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे, वारकरी साहित्य परिषदेचे जुन्नर तालुकाध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रमोद पानसरे, जयप्रकाश डुंबरे यांनी व इतरांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Development Management : शाश्वत विकासात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व

PM Modi On Dhan : सत्ता दिल्यास धानाचा एमएसपी ७८० रूपयांनी वाढवू; पंतप्रधान मोदी यांचे झारखंडवासियांना आश्वासन

Winter Season : हिवाळी हंगाम आणि थंडीस सुरवात

JPC On Waqf Board : भाजपचे आरोप आणि तणावानंतर जेपीसीची कर्नाटक वल्फ बोर्ड प्रकरणात उडी; घेणार तक्रारदार शेतकऱ्यांची भेट

Vaccination Animals : परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जनावरांचे लसीकरण सक्तीचे, पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT