Dairy Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Farmer : दूध उत्पादकांचा आक्रोश दुर्लक्षित

Milk Rate Issue : रविवारपासून दूधदरात आणखी कपात केली आहे. सद्यस्थितीला गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये इतका दर करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यापासून ही दर कपातीची मालिका सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला, काही प्रमाणात आलेल्या पिकावर शेतकऱ्यांनी रब्बीच्या आशेने पेरणी केली. मात्र अवकाळीच्या संकटाने घाला घातला आहे. त्यावर कडी म्हणून दूध दर कपातीच्या संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

रविवारपासून दूधदरात आणखी कपात केली आहे. सद्यस्थितीला गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये इतका दर करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यापासून ही दर कपातीची मालिका सुरू आहे. सरकार मात्र भाकड बैठका घेण्याचा सोपस्कार पूर्ण करत आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात गटबाजीची राजकीय साठमारी, त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीसंदर्भात नागरिक आक्रमक आहेत. या एकूण गदारोळात दूध उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली परवड दुर्लक्षित होत आहे.

का उद्‌भवली परिस्थिती?

केंद्र सरकारने गरज नसताना परदेशातून दुग्धजन्य पदार्थांची केलेली आयात

जागतिक बाजारपेठेत दूध भुकटी, लोणी याच्या घसरलेल्या किमती

राज्यातील दूध व्यवसाय खासगी संघाच्या घशात, नफेखोर धोरणामुळे परिस्थिती बिकट

दुग्ध व्यवसायाची स्थिती

सोलापूर जिल्ह्यात एकूण दुधाळ पशुधन ः ५ लाख ४४ हजार २५८

शासनाकडे जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख लिटर दूध होत असल्याची आकडेवारी आहे. मात्र सद्यपरिस्थितीत ही आकडेवारी तकलादू असून, मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रतिदिन २० लाख लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT