Sarus Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Sarus Bird Survey : गोंदियातील सारस सर्वेक्षणाला प्राधान्य द्या : उच्च न्यायालय

Bird Conservation : सारस पक्ष्यांची प्रजात सध्या धोक्यात आली असून या प्रजातीचे सर्वाधिक पण मोजके पक्षी गोंदिया जिल्ह्यात जीवित आहेत.

Team Agrowon

Nagpur News : सारस पक्ष्यांची प्रजात सध्या धोक्यात आली असून या प्रजातीचे सर्वाधिक पण मोजके पक्षी गोंदिया जिल्ह्यात जीवित आहेत. त्यामुळे, आधी गोंदिया जिल्ह्याचा सर्वेक्षण व नियोजनाला प्राधान्य देऊन शक्य तितक्या लवकर ते संपवा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

लुप्त होत असलेल्या सारस पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन व्हावे म्हणून उच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. या वेळी या विषयावर चर्चा झाली. यापूर्वी न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश पारित केले आहेत.

त्यानुसार, राज्य सरकारने सारस पक्ष्याच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटशी (एनसीएससीएम) करार करण्यात आला आहे. मात्र, हा अभ्यास पूर्ण होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडणार असल्याचे पाणथळ प्राधिकरणातर्फे न्यायालयात नमूद करण्यात आले. मात्र, हा कालावधी जास्त असल्याचे मत न्यायालयीन मित्रांनी व्यक्त केले.

सारस पक्ष्यांची प्रजात सध्या धोक्यात आली असून या प्रजातीचे मोजके पण सर्वाधिक पक्षी गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे, आधी गोंदिया जिल्ह्याचा सर्वेक्षण व नियोजनाला प्राधान्य देत भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमधीलही सर्वेक्षण शक्य तितक्या तातडीने संपवावे असे, आदेश उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. राधिका बजाज यांनी, वन विभागातर्फे ॲड. कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडली.

 एनसीएससीएमचे कार्य काय?

न्यायालयाने गोंदिया-भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर येथे आढळणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र ‘सारस संवर्धन समित्या’ स्थापन केल्या आहेत.

या समितीने त्यांच्या जिल्ह्याच्या परिसरात सारस पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी ओलसर जमीन ओळखायची आहे. परंतु, राज्य पाणथळ प्राधिकरणामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन प्राधिकरणाने एनसीएससीएम या संशोधन संस्थेशी करार केला आहे. ही संशोधन संस्था गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाणथळ जमिनीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price Demand: साताऱ्यात ऊसदराचा तिढा चिघळला; पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

Indian Agriculture Export: भारतीय शेतीमाल निर्यातीला वाढती संधी

Warana Sugar Factory: ‘वारणा’चा गळीत हंगाम सुरू; यंदा १३ लाख टन गाळपाचे लक्ष्य

Agniveer Recruitment: २८२ नौदल अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेच्या १५ जागा बिनविरोध; सहा जागासाठी निवडणूक

SCROLL FOR NEXT