Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या प्रश्नाचे पंतप्रधानांना उत्तर द्यावे लागेल

Team Agrowon

Nagar News : राहुल गांधी हे जनतेचा आवाज आहेत. त्यांनी अदानी उद्योग समूहासह इतर बाबींविषयी जनतेच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधांनाना उत्तर द्यावे लागेल.

राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली. मात्र जनेतचा हा आवाज सरकार दाबू शकत नाही, असे माजीमंत्री व कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, की राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमूहातील (Adani Group) महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे.

अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटींचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे, याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली.

भाजपचे लोक अदानीची बाजू घेत आहेत. अदानीच्या भ्रष्टाचाराला भाजपचा पाठिंबा आहे का? भाजपच्या संरक्षणात अदानीने देशातील जनतेला लुटले आहे.

सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर अत्यंत जलतगतीने म्हणजे २४ तासाच्या आत खासदारकी रद्द करण्यात आली यामागे भाजपचा हेतू काय होता हे स्पष्ट होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांच्या अत्याचाराचा सामना केला होता आणि याच सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र मिळवून दिले होते. नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात काँग्रेस पक्ष देशभर सत्याग्रह करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT