PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : मोदींनी कार्यभार स्वीकारताच जारी केला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi Update : पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता.०९) पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर आज मोदींनी पदभार स्वीकारताच पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत निर्णय घेतला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मला सुरूवात केली असून रविवारी (ता.०९) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर सोमवारी (ता.१०) दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी सर्वात पहिला निर्णय हा पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत घेतला. मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला.

मोदी सरकारने आपला पहिलाच निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेतला. मोदींनी १७ व्या हप्त्यापोटी २० हजार कोटी रूपये जारी केले. यावेळी मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू.

आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे केंद्र सरकारने १६ हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. तर १७ व्या हप्त्याची वाट शेतकरी वर्गाकडून पाहिली जात होती. ही प्रतिक्षा आता संपली असून सोमवारी मोदींनी जारी केला. याचा लाभ आता ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी भारत सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. यातील एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते.

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. या योजनेत लाभार्थींना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. हे पैसे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट- नोव्हेंबर आणि डिसेंबर- मार्च या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT