Soybeans Price Agrowon
ॲग्रो विशेष

Soybeans Rate : सोयाबीनमध्ये किंमतवाढीचा कल

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ मॉ न्सूनचा हंगाम आता संपला आहे

टीम अॅग्रोवन.

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ मॉ न्सूनचा हंगाम आता संपला आहे. हवामान सुद्धा कोरडे (Dry Weather) आहे. यामुळे आता खरिपाची आवक वाढती आहे. विशेषतः कापूस, मका, सोयाबीन व कांदा यांची आवक गेल्या दोन सप्ताहांत मोठ्या प्रमाणात वाढली.

ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत कांद्याची किमती दर वर्षी उच्चांकी असतात. हाच कल या वर्षीसुद्धा दिसत आहे. या सप्ताहात कांद्याच्या किमती वाढून रु. २,५६० वर आल्या आहेत. कापूस, मका यांच्या किमतीमात्र उतरत आहेत.

सोयाबीनच्या किमती या सप्ताहात ४.८ टक्क्यांनी वाढून ५,५५६ वर आल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी शासनाने रबी पिकांसाठी किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर केल्या. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,३३५ असेल. गेल्या वर्षी तो रु. ५,२३० होता.

एक नोव्हेंबर पासून NCDEX मध्ये मक्यासाठी मार्च २०२३ डिलिव्हरी व हळदीसाठी मे २०२३ डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये कपाशीसाठी नोव्हेंबर २०२३ साठी व्यवहार सुरू झाले. या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑक्टोबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.९ टक्क्याने घसरून ३१,४१० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा ०.२ टक्क्याने घसरून ३१,३६० वर आले आहेत. डिसेंबर डिलिव्हरी भाव रु. ३१,०६० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) २.३ टक्क्यांनी वाढून रु १,७३२ वर आले आहेत. यंदा कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती ६.७ टक्क्यांनी घसरून रु. २,१०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती १.८ टक्क्याने वाढून रु. २,१३८ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१५० वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मात्र या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी २३.१ दशलक्ष टन राहील असा शासनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २२.६३ दशलक्ष टन होते. मागणीसुद्धा वाढती राहील. हळद हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ७,३०९ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती २.० टक्क्यांनी घसरून रु. ७,४०६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,९९६ वर आल्या आहेत.

हरभरा हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती या सप्ताहात गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ४,६४७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने वाढून रु. ४,६५८ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. मूग मुगाच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,२०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे.

सोयाबीन सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) गेल्या सप्ताहात ती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,३०३ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ५,५५६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. तूर तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात २.५ टक्क्यांनी वाढून रु. ७,३३१ वर आली आहे.

तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे. कांदा कांद्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,९०० होती; या सप्ताहात ती वाढून रु. २,५६० वर आली आहे. टोमॅटो गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० होती. या सप्ताहात तिच्यात काही बदल झाला नाही. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT