Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : आळेफाटा बाजारात कांद्याचा दर २१० रुपये प्रतिदहा किलो

Onion Market : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (ता. १४) कांद्याच्या २८ हजार ९७६ पिशवींची आवक झाली.

Team Agrowon

Pune News : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (ता. १४) कांद्याच्या २८ हजार ९७६ पिशवींची आवक झाली. बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला २१० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

बाजारातील मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहाकिलोस १९० ते २१०, दोन नंबर कांद्यास १७० ते १९०, तीन नंबर गोल्टी १२० ते १६० तर चार नंबर बदला,चिंगळी कांद्यास ५० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

इंधनाचे भरमसाठ वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT