Development Presentation Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Development Plan : पंढरपूर विकास आराखड्याचे मुंबईत सादरीकरण

Development Presentation : पंढरपूर येथील नियोजित विकास आराखड्याच्या संदर्भात मुंबई येथे आज तीन सल्लागारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले.

Team Agrowon

Pandharpur News : पंढरपूर येथील नियोजित विकास आराखड्याच्या संदर्भात मुंबई येथे आज तीन सल्लागारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी, मंदिर समिती, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करावी. तसेच या आराखड्यामुळे बाधित होणार असलेल्या लोकांना योग्य मोबदला देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, याविषयी निर्देश दिले.

पंढरपूर येथील नियोजित कॉरिडॉर संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून शासनस्तरावर बैठका सुरू आहेत. तथापि कॉरिडॉरमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्थानिक लोकांची दुकाने आणि घरे बाधित होणार असल्याने कॉरिडॉरला त्यांचा विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर पंढरपूर विकास आराखड्या संदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे दूरदृष्य प्रणालीव्दारे या बैठकीत सहभागी झाले होते.

पंढरपूर येथील नियोजित आराखड्याच्या संदर्भात देशपातळीवरील वास्तुविशारद, पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कल्पना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती.

त्यात सहभागी झालेल्या सल्लागारांचे सादरीकरण विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक सल्लागार समिती समोर झालेले आहे. आजच्या बैठकीत त्यातील तीन सल्लागारांनी सादरीकरण केले.

काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर विकास

वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देतानाच परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

त्यानुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून आराखडा अंतिम करावा. जे निवासी, व्यापारी, दुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला दिला जावा आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, याविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT