Aashadhi Ekadashi Planning  Agrowon
ॲग्रो विशेष

Aashadhi Wari 2025 : सोयीसुविधा, अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा; ६ जुलैला आषाढी

Pandharpur Wari Planning : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी.

Team Agrowon

Pandharpur News : येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३० जून तर जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवासात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी. भंडीशेगाव येथील जलसंपदा विभागाच्या जागेत मोडकळीस आलेल्या इमारती असून त्या इमारती पाडण्यासाठी पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी.

पालखी मार्ग व पालखी तळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेजिंग रुमची संख्या वाढवावी. पिराच्या कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावा. आषाढी यात्रा कालावधीत एस.टी महामंडाळाकडून तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येतात. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी मुबलक प्रमाणात शौचालय, स्नानगृहाची व्यवस्था करावी. बसस्थानक स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.

मोडकळीस आलेल्या इमारती पाडा

भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे पालखी मार्गालगत असलेल्या जलसंपदा विभागाच्या जागेतील मोडकळीस आलेल्या इमारती पाडून ती जागा वारकऱ्यांसाठी रिकामी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाटबंधारे व बांधकाम विभागाला दिल्या आहेत. हे बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी या जागेत अतिक्रमण केले आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या जागेतील बांधकाम हटवून जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT