Bedana Season Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana Production : बेदाणा निर्मिती हंगामाची तयारी सुरू

Bedana Market Update : सध्या बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे नियोजन बेदाणा शेडमालक करत असून परराज्यातून सुमारे २० हजार मजूरही लवकर दाखल होणार आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजसह अन्य परिसरात बेदाणा तयार केला जातो. यंदाच्या हंगामाची पूर्व तयारी शेड मालकांनी सुरू केली आहे. सध्या बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे नियोजन बेदाणा शेडमालक करत असून परराज्यातून सुमारे २० हजार मजूरही लवकर दाखल होणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेदाण्याची निर्मिती सुरू होण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. त्यामुळे यंदाचा हंगाम वेळेत सुरू होणार असल्याचे चित्र आहे. गतवर्षी फळ छाटणीवेळी पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी फळछाटणी थांबवली होती. त्यामुळे गतवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला होता.

सुमारे तीन महिने बेदाणा निर्मिती सुरू होती. गतवर्षी राज्यात बेदाण्याचे ३ लाख टन उत्पादन झाले होते. जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून पाणीटंचाई असली तरी, शेतकऱ्यांनी शाश्वत पाणी उपलब्ध करून फळ छाटणी केल्या. त्यातच अनेक भागात पाणीटंचाई असल्याने फळछाटणी उशिरा केली. मात्र, अवकाळी पावसाने फुलोरावस्थेत असलेल्या बागांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात मिरज तालुक्याचा पूर्व भाग, जत तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य भागात बेदाणा तयार केला जातो. यंदाच्या बेदाण्याच्या हंगामाची पूर्व तयारी शेड मालकांनी सुरू केली असून यावर्षी दीड ते दोन हजार शेडवर बेदाणा तयार केला जाईल, अशी शक्यता वर्तविली आहे.

सध्या शेडची डागडुजी, दुरुस्ती, स्वच्छतेची कामे सुरू केली आहेत. बेदाणा निर्मितीसाठी मध्य प्रदेश, बिहार यासह अन्य राज्यांतून २० हजार मजूर येत्या पाच ते सहा दिवसांत दाखल होती. तर बेदाणा शेडवर स्थानिक मजूरही काम करण्यासाठी येतात. जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मिती सुरू होईल.

हंगामाला गती फेब्रुवारीनंतरच

द्राक्ष विक्री झाल्यानंतर जो माल शिल्लक राहतो, त्यापासून बेदाणा निर्मिती जानेवारी मध्यापासून सुरू होईल. परंतु बेदाण्यासाठी जे वाण आहेत, त्या वाणापासून बेदाण्याची निर्मिती फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे हंगामाला गती फेब्रुवारीनंतरच येणार आहे.

बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी विचारणा करत आहेत. त्यामुळे शेडची दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा आहे.
- सुनील माळी, बेदाणा शेड मालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT