Grape Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

Grape Farming : यंदाच्या हंगामात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाप फळ छाटणी सुरू होते. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिपाऊस झाला.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील द्राक्षफळ छाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलीची कार्यक्षमता मंदावली असल्याने घड तयार होण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातव गेल्या दोन वर्षात द्राक्ष पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये फळ छाटणी करण्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. यामुळे शेतशिवारात अजूनही उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे १ लाख ५० हजार एकरावर द्राक्षाचे क्षेत्र आहे. गतवर्षी ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. त्यानंतर द्राक्ष वाढीच्या काळात मान्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या. परंतु अपेक्षित दर नसल्याने पुन्हा संकटात सापडला. परिमाणी आर्थिक ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते.

यंदाच्या हंगामात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाप फळ छाटणी सुरू होते. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिपाऊस झाला. या पावसाचा फटका बागेला बसला. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू होणारी फळ छाटणी लांबणीवर पडली. सप्टेंबरपासून फळ छाटणीला काहीशी गती येते.

फळ छाटणसाठी परराज्यातून सुमारे ३० हजार मजूर दाखल झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी फळ छाटणीचे नियोजन करू लागला आहे. सध्या मिरज तालुक्याच्या पूर्व भागात काही अंशी फळ छाटणी सुरू झाली असली तरी, गती आली नाही. सप्टेंबरच्या मध्यापासून हळूहळू छाटणीला गती येईल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षी फळ छाटणीच्या प्रारंभी शेतशिवारात लगबग सुरू असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून फळ छाटणी आणि त्यानंतर फुलोरावस्थेत बागा आल्यानंतर अति पावसाचा फटका बसतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात सप्टेंबर महिन्याचा पंधरा दिवस झाले तरी, शेतशिवारात फळ छाटणीची लगबग सुरू नसून द्राक्ष फळ छाटणी घ्यायची की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

घड तयार होण्यास अडथळे येण्याची शक्यता

खरड छाटणी झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. त्यातव मॉन्सूनचा पाऊस सतत पडला. यामुळे मुळीची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी पठ तयार होण्यास अडथळे येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT