Wheat  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat E-Auction : गव्हाच्या किमंती रोखण्यासाठी सरकार सरसावले ; बफर स्टॉकमधील गव्हासाठी २०० टनापर्यंत बोली लावता येणार

Open Market Sale Scheme : देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीने OMSS अंतर्गत खरेदीदारांना २०० टनांपर्यंत बोली लावू शकणार आहेत.

Swapnil Shinde

Wheat Buffer Stock : देशांतर्गत बाजारपेठेतील अन्नधान्याच्या किमंती किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बफर स्टाॅकमधील गव्हाच्या खरेदीसाठी खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) अंतर्गत बोलीचे प्रमाण वाढवले ​​आहे. १ नोव्हेंबरपासून २०० टनांपर्यंत वाढले आहे.

धान्य खरेदी आणि वितरणासाठी सरकारची नोडल एजन्सी असलेल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने OMSS अंतर्गत आपल्या बफर स्टॉकमधून गहू विकते. देशातील प्रत्येक ई-लिलावात देऊ केले जाणारे एकूण प्रमाण देखील २ लाख टनांवरून ३ लाख टन करण्यात आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात खरेदीदार जसे की आटा मिल आणि छोटे व्यापारी ई-लिलावात २०० टनांसाठी बोली लावू शकतील, तर सध्या OMSS अंतर्गत हे प्रमाण १०० टन आहे. बोलीचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश खुल्या बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवणे आणि गव्हाच्या किमती स्थिर ठेवणे हा आहे.

या वस्तूंच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ २८ जूनपासून OMSS अंतर्गत आटा मिलर्स आणि छोट्या व्यापाऱ्यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना गहू आणि तांदूळ साप्ताहिक ई-लिलावाद्वारे विकत आहे. २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ई-लिलावाच्या १८ व्या फेरीत सुमारे १.९२ लाख टन गहू २,३१८ यशस्वी बोलीकर्त्यांना विकला गेला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT