Bail Pola  Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola : सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळिराजाची लगबग

Bail Pola 2024 : शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राब-राब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राब-राब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी बळीराजाने तयारी सुरू केली असून मोरक्या बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू आहे. यंदा पाऊस काळ देखील चांगला असल्याने शेतकरी सुखावला असून पोळा सणाची जय्यत तयारी केली जात आहे.

वषार्नुवर्षे चालत आलेला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. यंदा बैलपोळा सोमवार(ता.२) रोजी आहे .

आपल्या पशुधनाला सजवण्यासाठी सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. सर्जा-राजाला सजवण्यासाठी लागणारे इंगूळ, भोरकडी, पितळी शेंबी, चवरी, घुंगरू, कपाळ गोंडा, कवडी माळ, पैंजण, कासरा, वेसण गोंडे, बेगडी, म्होरकी, कासरा, चवरी आदी साहित्याने दुकाने सजली आहेत.

आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यासाठी येथील बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. यंदा पाऊस देखील वेळेत आणि चांगला पडलेला आहे. त्यामुळे पोळा साजरा करण्यास शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी

पोळा सण साजरा करण्यासाठी घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन केले जाते. या मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी असून, आकाराप्रमाणे शंभर ते दोनशे रुपये किंमत आहे, अशी माहिती सविता चित्रे यांनी दिली.

वर्षातून एकवेळ बैलांची सेवा करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी बैलपोळ्याच्या दिवशी मिळते. त्यामुळे बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या श्रृंगार साहित्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरीही त्याची चिंता न करता बैलांना आकर्षक सजविणार आहे. यंदा सुदैवाने पाऊस चांगला असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
- गोविंद यादव, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT