Electricity Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity News : महावितरणची मॉन्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात

Mahavitarn Worker : नांदेड परिमंडळातील मॉन्सूनपूर्व कामांना वेग आला असून, महावितरणचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने देखभाल दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड परिमंडळातील मॉन्सूनपूर्व कामांना वेग आला असून, महावितरणचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने देखभाल दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झालेल्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यामधे वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता यावा या दृष्टिने दरवर्षी महावितरणच्या वतीने मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.

यामध्ये विद्युत यंत्रणेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटने, रोहित्रांची देखभाल त्याचबरोबर उपकेंद्रामधील दुरुस्ती आदी कामांचा समावेश असतो. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी रखरखत्या उन्हातही महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत.

परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो.

सर्व भागाचा वीजपुरवठा खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात.

ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून वीज वाहिनीला स्पर्श करत असलेल्या झाडाच्या फांद्या छाटणे, फुटलेले पीन इंसुलेटर तपासणे व बदलणे, रोहित्रांची ऑइल पातळी तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वीजवाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, अशा प्रकारची अनेक कामे केली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT