Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Water Crisis : पावसाळ्याला सुरुवात; अजूनही १९ टँकर सुरू

Water Scarcity : गेल्या महिन्यात सतत १५ दिवसांहून अधिक काळ पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे गत आठवड्यात जिल्ह्यातील २७ टँकर बंद झाले.

Team Agrowon

Solapur News : गेल्या महिन्यात सतत १५ दिवसांहून अधिक काळ पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे गत आठवड्यात जिल्ह्यातील २७ टँकर बंद झाले. आता आठवडाभरात आणखी २३ टँकर बंद झाले आहेत. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्याच्या सुरवातीला ६९ टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू होता.

२८ मे रोजी ती संख्या ४२ पर्यंत घटली होती. मात्र, पावसाळ्याला सुरवात होऊनही बुधवार (ता. ४) पर्यंत १९ टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात यंदा मे महिन्यात ६९ टँकरद्वारे ५९ गावे व ५८७ वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. एक लाख ४५ हजार ९९० इतकी लोकसंख्या तर ६० हजार ९१६ जनावरे बाधित होती.

त्यांना पाणी पुरवण्यासाठी रोज १४९ खेपा मंजूर होत्या. मात्र, रोज १०४ पर्यंत खेपा होत होत्या. यंदा लवकरच १३ मेपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सतत १७ दिवस पाऊस पडत राहिला. त्यामुळे बुधवारपर्यंत एकूण ५० टँकर बंद झाले आहेत. मात्र, अद्याप १९ टँकरद्वारे १९ टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

तालुकानिहाय टँकर

सांगोला ३

मंगळवेढा ६

माढा १

करमाळा २

माळशिरस १

दक्षिण सोलापूर ४

उत्तर सोलापूर १

अक्कलकोट १

टंचाई स्थितीवर एक दृष्टिक्षेप

सुरू असलेले टँकर : १९

टंचाईग्रस्त गावे : ९

टंचाईग्रस्त वाड्या : १३१

बाधित लोकसंख्या : ५६,३३२

बाधित पशुधन : १२,५३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य

Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध

APMC Investigation Report: बाजार समिती चौकशी अहवाल मोघम, त्रोटक

Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद

Cotton Farmer Issue: स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

SCROLL FOR NEXT