Unseasonal Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain: मॉन्सूनपूर्व पावसाचा मराठवाडा, नाशिकमध्ये जोर

Rain Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील अनेक भागांत सोमवारी (ता. १२) दुपारी १२ वाजेनंतर कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घालने सुरू केले होते.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील अनेक भागांत सोमवारी (ता. १२) दुपारी १२ वाजेनंतर कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घालने सुरू केले होते. सायंकाळपर्यंत हा जोर वेगवेगळ्या भागांत कायम होता.

जालना जिल्ह्यातील अंबड शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी शहागड परीसरात वादळ झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगाव येथे विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू, आळंद परिसरात दुपारी १२ वाजता वादळी वाऱ्यासह १० मिनिटे धुव्वाधार पाऊस झाला.

टाकळी राजेरायससह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बीड शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाटही खूप होता. गेवराई येथे जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला.

वडवणीतही पावसाला सुरुवात झाली होती. केज तालुक्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी झाल्या. शिरूरकासार तालुक्यात काही महसूल मंडलांत जोरदार पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, लातूर, धाराशिवमध्ये सोमवारी पहाटे एकच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर कडक ऊन होते.

विदर्भात, सातारा, जळगाव जिल्ह्या़ंत ढगाळ वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस, दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात

परभणी जिल्ह्यात सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात

सोलापूर भागात ढगाळ वातावरण, काही भागांत पावसाची हजेरी

नाशिकमध्ये सलग आठव्या दिवशी हजेरी

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (ता. १२) सलग आठव्या दिवशी विविध भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान वाढले असून आंबा, डाळिंब व भाजीपाला उत्पादकही अडचणी सापडले आहेत. नाशिक शहर परिसरासह नाशिक, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व इगतपुरी तालुक्यांत पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT