Pre-Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain: पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस

Pune Rainfall Update: पुणे जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पूर्वमोसमी पावसाने पावसाचा थाट दाखवला. गिरीवनमध्ये २५.५ मिमी पावसासह जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांच्या खरिप कामाला वेग मिळाला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: शहरात सलग पाचव्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मुळशी तालुक्यातील गिरीवन येथे सर्वाधिक २५.५ तर डुडूळगाव परिसरात २१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहर परिसरात व पिंपरी- चिंचवड परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

मे महिन्यात उन्हाचे चटके अंगाची लाहीलाही होत असते. उकाड्याने पुणेकर हैराण होतात. मात्र या वर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात ४३ अंशांपर्यंत गेलेला उष्णतेचा कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांपर्यंत खाली आला आहे.

किमान तापमानातही घट झाल्यामुळे उकाडा कमी झाला आहे. सध्या किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून रात्री हवेतील गारवा वाढला आहे. तर गुरुवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेली येथे २०.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. १४) शहर परिसरात दुपारी हलकासा उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, अधून-मधून ढगाळ वातावरण होत होते. पुणे शहरातील हडपसर, मगरपट्टा, विश्रांतवाडी, खराडी, वाघोली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर ग्रामीण भागात भोर, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत असून पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे. झालेला पाऊस हा खरिपासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी शेतात खते टाकणे, नांगरट करणे, कांदा काढणे, बाजरी काढणे अशा कामांना वेग दिला आहे.

प्रमुख केंद्रांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

गिरीवन २५.५

डुडूळगाव २१.५

चिंचवड १९.०

भोर १०.५

निमगिरी ९.०

हडपसर २.०

मगरपट्टा ०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT