Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain Damage: मॉन्सूनपूर्व पावसाने नाशिकमध्ये ८३८ हेक्टरवर पिकांसह नुकसान

Pre Monsoon Storm: नाशिक जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्यावर सर्वाधिक परिणाम झाला असून ८३८ हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून वादळी वाऱ्यासह होत असलेला मॉन्सूनपूर्व मुसळधार पाऊस शेती पिकांसह व्यावसायिकांसाठी अडचणीचा व नुकसानकारक ठरत आहे. विजा पडून जीवितहानी झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण उडाली. नाशिक शहरासह नाशिक ग्रामीण, बागलाण, निफाड, सिन्नर, कळवण, इगतपुरी, नांदगाव या तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांचे पत्रे उडाले.

कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक नुकसान अहवालानुसार बागलाण तालुक्यात सर्वाधिक ५२० हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले. यासह तालुकानिहाय नाशिक १५०, मालेगाव ११४, निफाड २१, दिंडोरी १५, चांदवड १०, सिन्नर ५ तर कळवण तालुक्यात ३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वादळी वाऱ्यामुळे व्यापाऱ्यांचे शेड उडाल्याने नुकसान झाले. नाशिक शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचवटी, जुने नाशिक, सिडको या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

बागलाण तालुक्यातील केळझर परिसरात केरोबानगर वाठोडामध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. अनेक घरांचे पत्रे उडाले. शेतामध्ये झाकलेल्या कांद्यावरील ताडपत्रीही उडाल्या. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या कांद्यावरील झाकलेल्या ताडपत्र्या उडून गेल्याने कांदा भिजला.

वीज पडून जीवितहानी

सोनगिरी (ता. सिन्नर) येथे वीज पडून रवींद्र प्रभाकर बोडके (वय ३४) यांचा मृत्यू झाला. चिंचखेड (दिंडोरी) येथील शेतकरी भास्कर लभडे यांच्या गाभण गीर गायीवर वीज कोसळून गायीचा जागीच मृत्यू झाला. नांदगाव तालुक्यातील मौजे कुसुमतेल येथे वीज पडून बैल गतप्राण झाला. पावसामुळे आतापर्यंत ७५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.

पीकनिहाय नुकसान (हेक्टर)

कांदा ७४४

भाजीपाला ७७

द्राक्ष ५

डाळिंब ४

पेरू १

मका ५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT