Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : लातूर, धाराशिवमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान

Heavy Rain : सर्वाधिक पाऊस लातूर शहरावर कोसळला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले तर अनेक घरांमध्ये पाणी घुसले.

Team Agrowon

Latur/Dharashiv News : मागील काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. यामुळे खरीप हंगामातील मशागतीच्या कामाचा खोळंबा झाला असून, दुसरीकडे पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे.

यात मंगळवारी (ता. २७) दुपारनंतर पावसाने थैमान घातले. सर्वाधिक पाऊस लातूर शहरावर कोसळला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले तर अनेक घरांमध्ये पाणी घुसले. जलमय झालेल्या लातूरचे जनजीवन विस्कळीत झाले.

धाराशिव जिल्ह्यातही हा पाऊस झाला. कळंब व वाशी तालुक्यात झालेल्या मुबलक पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात चार दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे. लातूर शहरात दुपानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. काही भागांत दुचाकी वाहने पाण्यात वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा करण्याचे काम महापालिका व प्रशासनाकडून सुरू होते.

घरात पाणी घुसल्यानंतर झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्यात येत होते. आमदार अमित देशमुख यांच्यासह खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी पाणी घुसलेल्या भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत संवाद साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT