Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : पावसाने ४ हजार शेतकऱ्यांचे तीन हजार एकर क्षेत्र बाधित

Heavy Rain Crop Loss : मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Pune News : मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल आणि ग्रामविकास कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार १४३ गावांतील ४,६८८ शेतकऱ्यांचे ३,२७८ एकर क्षेत्रावरील दोन कोटी २७ लाख ३५ हजार ८६० रुपयाचे पीक नुकसान झाले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात चास, कळंब, लोणी, कुरवंडी, गिरवली, अवसरी खुर्द, गावडेवाडी, रांजणी आदी ४० गावांत मुसळधार आणि ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामध्ये कांदा, आंबा, बाजरी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी तरकारी पिके आणि मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक आदी पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे.

तसेच काढणी योग्य असलेली बाजरीची पिके काळी पडली. कणसे भिजल्याने त्याला मोड फुटले आणि संपूर्ण बाजरीचे पीक भुईसपाट झाले, तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने कांदे वाहून गेले असून, विहिरींची पडझड झाली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या होत्या.

तहसीलदार संजय नागटीळक यांनी सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी यांना पंचनामे करण्याचे संयुक्त आदेश दिले होते. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जात वस्तुनिष्ठ पंचनामे केले आहेत.

फळबागा जिरायती पिके व बागायत पिके अशी वर्गवारी करण्यात आली आहे. फळबागांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये, बागायती पिकांना हेक्टरी १७ हजार रुपये व जिरायती पिकांना हेक्टरी ८ हजार ५०० रुपये रक्कम नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT