Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरूच

Rain Update Pune : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. भिगवण व परिसरातील तक्रारावाडी, मदनवाडी, डिकसळ (ता. इंदापूर) येथे वादळी वाऱ्यासह ४० मिमी इतका मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे अंबा, केळी, आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. बारामती, गिरीवन येथे चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. इंदापूर भागात वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) सकाळपासून काही अंशी ढगाळ वातावरण होते. परंतु नऊ वाजल्यानंतर काही प्रमाणात ऊन पडले होते. दुपारी चारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली. मात्र या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा तयार झाल्याने कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

तसेच उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपूर्वी ४३ अंशांपर्यंत पोहोचलेला कमाल तापमानाचा पारा पावसामुळे सोमवारी ३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. पूर्वमोसमी पावसामुळे व वाऱ्याच्या वेगाने अनेक ठिकाणी आंबा, बाजरी, कांदा अशा पिकांचे नुकसान होत आहे. तर उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

इंदापूर तालुक्यात नुकसान

इंदापुर तालुक्यामध्ये आंबा, केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. येथील महाबॅंक ग्रामीण विकास केंद्रातील पर्जन्य मापकावर ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील काझड- शिंदेवाडी येथील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होऊन अंदाजे तीन एकरांमध्ये मिळून १५ ते २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पार्वती मारुती गायकवाड यांनी दिली. या नुकसानीची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली आहे.

भिगवण परिसरात विक्रमी पाऊस

भिगवण ः भिगवण व परिसरातील तक्रारावाडी, मदनवाडी, डिकसळ (ता. इंदापूर) येथे वादळी वाऱ्यासह ४० मिमी इतका मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबा, केळी, आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. फळबाग शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. इंदापुर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ परिसराला सोमवारी (ता.१३) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

बारामती १०.५, गिरीवन १०.५, निमगिरी ९.५, लव्हळे ७.५, बल्लाळवाडी ५, दौंड ५, हडपसर ४.५, हवेली ४.५, एनडीए ३.५, कोरेगाव पार्क ३, शिवाजीनगर २.९, वडगाव शेरी २.५, तळेगाव ढमढेरे २.५, लोहगाव २.२, मगरपट्टा २, पुरंदर २, माळीण १.५, पाषाण १.४, खेड १, राजगुरुनगर ०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT