Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : सातारा जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कामांना सुरुवात

Agriculture Department : या वर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी दोन लाख ४४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे.

Team Agrowon

Satara News : या वर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी दोन लाख ४४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, एक लाख ३६ हजार टन खताची मागणी आहे. सध्या ७० हजार ६९२ टन खत उपलब्ध आहे.

पूर्वमोसमी पाऊस झाल्याने पोषक वातावरण झाल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. आडसाली उस लागवडीसाठीची शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. पेरणीची कामेही वेळेत करता यावी या दृष्टीने मशागतीची कामे उरकली जात आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ४४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे.

त्यासाठी कृषी विभागाने बियाणे व खतांची उपलब्धता करून ठेवण्याची लगबग सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सोयाबीनची कमतरता भासते. कारण सोयाबीनचीच पेरणी सर्वाधिक होते. खरीप हंगामासाठी बियाण्याची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागाने बियाण्यांचा साठा मंजूर करून ठेवला आहे.

यामध्ये महाबीजकडून नऊ हजार ३६५ क्विंटल व खासगी ३५ हजार ४३० क्विंटल अशा एकूण ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या हंगामातही सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनची पेरणी अंदाज आहे, मात्र सोयाबीनचे दर वाढत नसल्याने इतर पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे.

यंदा एक लाख ३६ हजार टन खतांची आवश्यकता आहे. त्यापैकी एक लाख नऊ हजार ५०० टन खतांची मागणी केली आहे. त्यामध्ये युरिया ३७ हजार ७०० टन, डीएपी दहा हजार टन, एसएसपी ११ हजार ७०० टन, एमओपी चार हजार १०० टन, एकूण संयुक्त ४६ हजार टन अशी खतांची मागणी केली आहे. जिल्ह्याला एक लाख नऊ हजार ५०० टन खताची मंजुरी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT