Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्णत्वाकडे

Cotton Sowing : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू असून, या आठवड्यात ही लागवड पूर्ण होईल असा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू असून, या आठवड्यात ही लागवड पूर्ण होईल असा अंदाज आहे. यंदा लागवडीत काहीशी घट येईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वाधिक पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड जामनेर तालुक्यात झाली आहे. जामनेरात सुमारे ३५ हजार हेक्टरवर बागायती कापूस पीक आहे. त्यापाठोपाठ चोपडा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव भागात पूर्वहंगामी कापूस पीक आहे. खानदेशात सुमारे दोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक असल्याची स्थिती आहे.

पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे २० ते ३० हजार हेक्टरने कमी होताना दिसत आहे. तर एकूण कापूस लागवडीतदेखील खानदेशात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक होते. कोरडवाहू व पूर्वहंगामी मिळून सुमारे सव्वाआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती.

जळगाव जिल्ह्यात पाच लाख ११ हजार, धुळ्यात दोन लाख हेक्टरवर आणि नंदुरबारमध्ये एक लाख १३ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. यंदा कापूस लागवड कमी होईल. काही भागात मोठी तर काही भागात अल्प घट होण्याचा अंदाज आहे. जामनेर तालुक्यात तीन ते चार टक्क्यांनी कापसाची लागवड कमी झाली. पारोळा, जळगाव, चोपडा भागांतही अशीच स्थिती आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात १० ते १२ टक्के कापसाखालील क्षेत्र कमी होईल, अशी स्थिती आहे.

धुळे, साक्री व शिंदखेडा भागात मात्र तीन ते चार टक्केच क्षेत्र कमी होताना दिसत आहे. नंदुरबारमध्ये शहादा व तळोदा तालुक्यांत कापसाखालील क्षेत्रात १० ते १२ टक्के घट मानली जात आहे. नवापूर, नंदुरबार भागात मात्र कापसाखालील क्षेत्रात अल्प घट होईल.

कापसाऐवजी पपई, केळी व भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळले आहेत. अनेकांनी पावसानंतर सोयाबीन, मका लागवडीचे नियोजन केले. काहींनी मध्यम, हलक्या जमिनीत कापसाऐवजी उडीद, तूर किंवा तूर व आंतरपिकाचे नियोजन केले आहे.

यंदा उशिरापर्यंत पूर्वहंगामी लागवड

खानदेशात यंदा अनेकांच्या बाजरी, मका, कांदा पिकास उशिर झाला. यामुळे अनेक शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवड १ ते ३ जूनदरम्यान करू शकले नाहीत. ४, ५ जूननंतर अनेकांची लागवड सुरू झाली आहे. अनेकांच्या लागवडी पाच ते सात दिवस उशिराने झाल्या आहेत. यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड खानदेशात सुरूच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT