Agriculture Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : नान्नज, रानमसले परिसरात विजेअभावी पिके धोक्यात

Crop Loss : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे गेल्या आठवडाभरापासून विजेची मागणी वाढली असून, वेळेवर वीज नसल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Solapur News : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे गेल्या आठवडाभरापासून विजेची मागणी वाढली असून, वेळेवर वीज नसल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे. बीबीदारफळ वीज उपकेंद्रात अंतर्गत रानमसले येथे वीज पुरवठा होतो, रानमसले शिवारात गेल्या आठवड्यामध्ये दर दहा मिनिटाला वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.

सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शिरापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिकांना कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला पिकांना पाणी देण्याची धडपड सुरू आहे. मात्र कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांचे पिके पाण्यावाचून जळू लागले आहेत.

अशीच परिस्थिती नान्नज उपकेंद्रांतर्गत अवस्था असून, यामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीबीदारफळ उपकेंद्राची वीज पुरवठा करण्याची क्षमता पाच एमव्हीए इतकी असून, या अंतर्गत बीबीदारफळ शिवारातील ५० तर रानमसले शिवारातील ८४ असे एकूण १३४ डीपी सुरू आहेत. यातील बहुतांश डीपी हे १०० केवी क्षमतेचे आहेत.

जसजसा उन्हाळा सुरू होत आहे तसतसे विजेची मागणी वाढत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे आठ तासाऐवजी काही गावांमध्ये चार-चार तासाची शिफ्ट चालू केली आहे. यामुळे कॅनॉलला पाणी असूनही शेतकऱ्यांना घेता येत नाही तसेच विहिरीत पाणी असूनही पिकांना देता येत नाही अशी अवस्था झाली आहे.

बीबीदारफळ वीज उपकेंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी वाढल्याने सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेती पंपांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी चार-चार तासाच्या शिफ्ट सुरू केले आहेत. सध्या तरी शेतकऱ्यांनी वीज बचतीचा अवलंब करावा. पिकांना पाणी देण्याच्या काळामध्ये बोअरवेल्स बंद ठेवल्यास योग्य दाबाने वीज पुरवठा होऊ शकतो.
- पुंडलिक कुंभार, सहायक अभियंता, कारंबा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT