Thermal Plants Agrowon
ॲग्रो विशेष

पंजाबमधील वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर; एक तृतीयांश थर्मल प्लांट्स बंद

घरगुती औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी राज्याला ७५०० मेगावॅट वीज लागते. मंगळवारी (दिनांक २६ एप्रिल) पीएसपीसीएल केवळ ६७०० मेगावॅट वीजच उपलब्ध करून देऊ शकले आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागाला २ ते १० तासांपर्यंत लोडशेडिंग सहन करावे लागते आहे.

Team Agrowon

पंजाबमधील वीज पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण राज्यातील १५ औष्णिक विद्युत निर्मिती (Thermal Plants) प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प बंद पडले आहेत. विजटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून राज्याला २०१० मेगावॅट विजेची कमतरता भासते आहे.

पंजाब राज्य वीज निर्मिती मंडळासमोर (PSPCL) लोडशेडिंगशिवाय पर्यायच उरलेला नाही. घरगुती आणि कृषी गरजांसाठी राज्याला ७५०० मेगावॅट वीज लागते. मंगळवारी (दिनांक २६ एप्रिल) पीएसपीसीएल केवळ ६७०० मेगावॅट वीजच उपलब्ध करून देऊ शकले आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागाला २ ते १० तासांपर्यंत लोडशेडिंग सहन करावे लागते आहे.

२४ एप्रिल अखेरीस लेहरा मोभात प्रकल्पात केवळ ६ दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. गोईंदवाल प्रकल्पात ३ दिवस, तळवंडी साबो प्रकल्पात ५ दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे.

इतर सर्व प्रकल्पातही कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. आताच राज्यात ही परिस्थिती आहे. जूनपासून सुरु होणाऱ्या भातपिकाच्या हंगामात तर राज्याला अधिकच्या विजेची गरज लागणार आहे. भातपिकाच्या हंगामात राज्याला किमान १५००० मेगावॅट वीज लागणार आहे. ही वाढीव गरज भागवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann)यांनी केंद्र सरकारला साकडे घातले आहे.

वीजनिर्मिती प्रकल्पांनी किमान २८ दिवस पुरेल एवढा कोळसा साठवून ठेवावा, असा नियम आहे. मात्र या प्रकल्पांना पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत नसल्याने या प्रकल्पांना आहे तेवढ्या कोळशावर समाधान मानावे लागते.

छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतून पंजाबला पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाना वीजनिर्मिती करता येत नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याशिवाय कोळशाच्या वाहतुकीसाठी पुरेशा प्रमाणात वॅगन्स उपलब्ध होत नसल्याचा फटकाही बसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Exam Fee Waiver: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; ‘झिरो चलन’ सुविधेतून अर्ज दाखल

Crop Residue Management: पीक अवशेषांतून जपले मातीचे आरोग्य; नानोटे यांचे सुपीकता टिकविण्याचे प्रयोग

Moringa Powder Business: मोरिंगा पावडरीचा ‘अर्का ड्राइड नॅचरल्स’ ब्रॅंड

Political Power Struggle: सत्तेच्या साठमारीचा गळू

Teacher Constituency Election: दुपारी दोनपर्यंत पदवीधर ३९, तर शिक्षकांचे ४९ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT