Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर ः जिल्हाधिकारी अरोरा

कुक्कुटपालन हा अतिशय सोपा आणि कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच. मुख्यतः गायी, म्हशी, शेळ्या आणि कुक्कुटपालन (Poultry farming) हे घरोघरी सांभाळून त्यातून शेतीलापूरक अर्थार्जन मिळते.

यापैकी कुक्कुटपालन हा अतिशय सोपा आणि कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा (Collector Nima Arora) यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Center) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा)च्या संयुक्त विद्यमाने प्रात्याक्षिक कीट वाटप कार्यक्रमात आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्षा या नात्याने बोलत होत्या. आत्मा प्रकल्प संचालक कार्यालय परिसरात कुक्कुटपालन धारकांना जिल्हाधिकारी अरोरा यांच्याहस्ते कीट वाटप करण्यात आली.

यावेळी प्रकल्प संचालक आरिफ शाह, शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, डॉ. गोपाल मंजूळकर, प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मंजूळकर यांनी काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्माचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोळ, अर्चना पेठे, व आत्माच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT