Team Agrowon
गेल्या दोन-तीन वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात कुक्कुट खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये मका, सोयाबीन, तांदूळ कणी या दरात मोठी वाढ झाली आहे.
परिणामी अंडी उत्पादन खर्च वाढता आहे.
मात्र असे असताना राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे जाहीर होणारे दर उत्पादन खर्चापेक्षा अनेकदा कमी राहिल्याने कुक्कटपालकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
उत्पादन खर्चाच्या खाली अंडी दर मिळत असल्याने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या मनमानी कारभाराबद्दल कुक्कटपालकांनी संताप व्यक्त केला आहे.
या बाबत उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटनेने पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट प्रवरानगर (जि. नगर) येथे भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.
उत्पादन खर्च व मिळणाऱ्या दरात तफावत असल्याने मागील पंधरा दिवसांत नाशिक जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.