Poultry Business Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Business : कुक्कटपालन व्यवसाय शाश्‍वत आर्थिक उत्पन्नाचे साधन

Sustainable Financial Income : कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चालना मिळणार असून, हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्‍चित वाढ होते. कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चालना मिळणार असून, हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पशुसंवर्धन उपायुक्त समीर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुधन विकास अधिकारी स्नेहंका बोधनकर, सहायक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने उपस्थित होते. कुक्कुटपालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा.

तसेच या उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी आल्यास संबंधित गटविकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोहिनकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी केले. तर सधन कुक्कुट विकास गटाचे प्रमुख व पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT