District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrapur District Bank : चंद्रपूर जिल्हा बॅंकेतील नोकर भरतीला स्थगिती

Chandrapur District Bank Recruitment : न्यायालातील प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत जिल्हा बॅंकेतील नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : चंद्रपूर ः न्यायालातील प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत जिल्हा बॅंकेतील नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. सहकाय आयुक्‍त तसेच निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत.

चंद्रपूर जिल्हा बॅंकेत ३६० पदांकरिता नोकर भरती प्रक्रिया राबविण्याचे प्रस्तावित आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्याने रखडली आहे. नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल आहे. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत बॅंकेने उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. त्यामध्ये टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जाईल, असे नमूद आहे.

त्यानंतर ही याचिका २० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाली काढली. मात्र बॅंकेच्या संचालक मंडळाने शपथपत्राकडे दुर्लक्ष केले. ठराव घेऊन आयटीआय लिमिटेड या कंपनीची नोकर भरती प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. ऑनलाइन परीक्षेची तारीख जाहीर झाली. पण आचारसंहितेमुळे ती पुढे ढकलण्यात आली. दुसरीकडे या नोकर भरतीच विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक अवमान याचिका दखल करण्यात आली आहे.

त्यामध्ये बॅंकेच्या नोकर भरतीला स्थगिती देत टीसीएस व्यतिरिक्‍त अन्य कोणत्याही कंपनीमार्फत नोकर भरती प्रक्रिया राबवू नये असे निर्देश बॅंकेला देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. हाच धागा पकडत सहकार आयुक्‍तांकडे देखील या प्रश्‍नी तक्रार करण्यात आली. त्यात टीसीएसऐवजी आयटीआय या कंपनीची बॅंकेने निवड केली याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

तीन डिसेंबरला सुनावणी

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांनी त्यांचा अहवाल अपर आयुक्‍तांकडे सादर केला. त्याआधारे न्यायालयाचा अवमान होऊ नये, या उद्देशाने न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, असे आदेश अपर आयुक्‍त व विशेष निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी बॅंकेला दिले आहेत. याचिकेवर तीन डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT