Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला विरोध; मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाटलं, शेतकरी पोलिसांत झटापट

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Oppose Farmers : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी जोरदार विरोध होत आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते दौरा रद्द झाल्याने हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

यावेळी कृती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकाजवळ महामार्ग रद्द व्हावा या आशयाचे निवेदन आंदोलक शेतकरी ठेवत असताना पोलिसांकडून हा फलक फाटल्याचे गिरीष फोंडे म्हणाले.

फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गास मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. महामार्ग रद्द केला नाही. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा मार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदार यांना शक्ती देण्याकरिता होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरपंच शिवाजी पाटील यांनी, शक्तिपीठ महामार्गामुळे साजणी या माझ्या गावातील जमिन निम्मी जाणार असून भूमिहीन होणारा हा मार्ग कशाला हवा असा संतप्त सवाल केला.

माणगाव कृती समितीचे धनपाल गवळी यांनी, शक्तिपीठ महामार्गामुळे माणगाव गावास पूराचा धोका वाढणार असून बागायती जमिनी नष्ट होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे शिवगोंडा पाटील,‌राजगोंडा बेले,राजू मुगळखोड, युवराज शेटे, सुनिल बन्ने, धन्य कुमार मगदूम, जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील, के.डी.पाटील, अंकुश चव्हाण, सुरेश बन्ने, महावीर पाटील, बाळासाहेब गुरव, महावीर देमाण्णा, शामराव कांबळे, अभिजित देमाण्णा, संजय देमाण्णा आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा गनिमी कावा

गनिमी काव्याने भूमी अधिग्रहणाच्या नोटीसची आंदोलकांनी होळी केली. तसेच पोलीस नोटीस काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला. उपस्थित शेतकऱ्यांनी शासन व शक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर काहीकाळ आंदोलक आणि पोलीस यांच्यात फलकावरून वाद सुरू होता. अशातच शेजारी असणाऱ्या प्राथमिक शाळेत राष्ट्रगीत सुरू झाल्याने हा गोंधळ थांबवून सर्वच स्तब्ध झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT