Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Nana Patole : प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे वारंवार सुचविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोस्टल मतांनी अक्षरशः तारले.

Team Agrowon

Nagpur News : प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे वारंवार सुचविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोस्टल मतांनी अक्षरशः तारले. त्यांना साकोली (जि. भंडारा) मतदारसंघातून केवळ २१४ मतांनी निसटता विजय मिळवता आला. भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांनी त्यांना अतिशय निकराची लढत दिली.

पटोलेंचा विजय अतिशय निसटता होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पटोले लढतीत कायम राहण्यासाठी संघर्ष करीत होते. दर फेरीगणिक त्यांच्यातील आघाडी-पिछाडी बदलत होती. कधी पटोले ५००-६०० मतांनी पुढे जात होते, तर कधी ब्राह्मणकर पुढे होते.

मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्याच्या पूर्वार्धात ब्राह्मणकरांनी जोर लावला. २४व्या फेरीत ब्राह्मणकर दोन हजार मतांनी आघाडीवर होते. ती आघाडी ते कायम ठेवून होते. अखेरच्या फेरीपर्यंत ब्राह्मणकरांचे मताधिक्य काहीसे कमी झाले, मात्र त्यांनी आघाडी कायम ठेवली.

पोस्टल मतांच्या बेरजेनंतर मात्र नानांनी ब्राह्मणकरांनी २१४ मतांनी मात केली. नानांचा असा निसटता विजय होणे, आश्चर्यकारक असले तरी, मतदारसंघातील एकूण वातावरण पाहता त्यात अनेकांना नवल वाटत नाही.

मतदारसंघात नानांच्या विरोधात ॲंटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात होती. त्याचा फटका त्यांना बसला. पराभूत ब्राह्मणकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यावर हे विश्लेषण लिहिपर्यंत निर्णय आलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT